महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले, नांदेडमध्ये भरदिवसा 30 लाख लंपास

माळ टेकडी येथील फळ विक्रेता म.साजिद म. हसन व सय्यद मुजफिर सय्यद गुलाब हे दोघे दुचाकीवरून आज २ वाजताच्या सुमारास बँकेत ३० लाख रुपये घेऊन जात होते. दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांनी धक्का देऊन खाली पाडले. त्यांच्यावर बंदुक रोखून त्यांच्याकडील ३० लाख रुपये लंपास केले.

By

Published : Feb 10, 2020, 9:33 PM IST

cash-robbed-in-nanded-police-file-case
cash-robbed-in-nanded-police-file-case

नांदेड - दोन व्यापाऱ्यांना बंदुक व तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील ३० लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. व्यापारी बँकेत पैसे भरण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्याच्या हत्येसाठी दिली होती ४० लाखांची सुपारी, चौघे ताब्यात

शहरातील माळ टेकडी येथील फळ विक्रेता म.साजिद म. हसन व सय्यद मुजफिर सय्यद गुलाब हे दोघे दुचाकीवरून आज २ वाजताच्या सुमारास बँकेत ३० लाख रुपये घेऊन जात होते. दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांनी धक्का देऊन खाली पाडले. त्यांच्यावर बंदुक रोखून त्यांच्याकडील ३० लाख रुपये लंपास केले. त्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details