नांदेड-जिल्ह्यातील भोकर येथील वन परिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी आशिष हिवरे यांना 10 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10 लाखाची खंडणी मागणाऱ्या 2 जणांविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वन परिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्याकडे दहा लाखाची खंडणी मागणाऱ्या दोन जणांविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखली दिली होती. आशिष हिवरे यांच्या तक्रारीवरुन भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भोकरचे वन परिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांना मागील काही दिवसांपासून संशयित आरोपी गोपीनाथ मुंगल रा.गाडेगाव, संभाजी उबाळे रा. नांदेड हे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत होते.मागणी केलेले पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यासही त्यांनी सुरुवाती केली होती.
वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष हिवरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भोकर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध पोलिसांनी कलम 384,507,34 भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील नाईक हे करत आहेत.