महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये पक्षांतरांच्या विषयावरुन भाजप-काँग्रेस नगरसेवक भिडले

सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले.

By

Published : Aug 8, 2019, 9:26 PM IST

नांदेडमध्ये पक्षांतरांच्या विषयावरुन भाजप-काँग्रेस नगरसेवक भिडले

नांदेड- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले. त्यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ करत दिपकसिंह रावत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे सभा काही काळ तहकुब करण्यात आली. तर भाजप नगरसेवक दिपकसिंह रावत यांना निलंबित करण्यात आले.

नांदेडमध्ये पक्षांतरांच्या विषयावरुन भाजप-काँग्रेस नगरसेवक भिडले

नांदेड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर दिक्षा धबाले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मनपा आयुक्त लहुराज माळी यांच्या उपस्थितीत पार पडली. यासभेत बोलताना भाजप नगरसेवक दिपकसिंह रावत यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक खासदार प्रताप पाटलांच्या संपर्कात तसेच भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य केले. त्यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी त्यावर जोरदार आक्षेप नोंदवत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर काँग्रेस नगरसेवक फईम हे दिपकसिंह रावत यांच्यावर धावून गेले. यावेळी दोघांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सभेतील गोंधळ पाहता सभा काही काळासाठी तहकुब करण्यात आली.

सभेच्या सुरुवातीस सर्व नगरसेवकांनी शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, खड्डे या प्रश्नावर अधिकार्‍यांना धारेवर धरले. अनेकांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांच्या या आक्रमक भुमिकेनंतर मनपा आयुक्त माळी यांनी शहरातील खड्ड्याच्या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन देत या कामात अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यासह गुत्तेदारावर देखील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शहरातील पाणी प्रश्नाविषयी देखील नगरसेवक आक्रमक झाले.

भाजप सरकारच्या अभिनंदनाचा ठराव-

मनपाची सर्वसाधारण सभा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेता गुरप्रित कौर सोडी यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा झालेला विजय, खासदार प्रताप पाटील यांचा विजय, तीन तलाक, कलम 370 विधेयक व मराठा आरक्षणाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

ABOUT THE AUTHOR

...view details