महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थोडा वेळ द्या..! शेतकऱ्यांचा एकही रुपया ठेवणार नाही - अशोक चव्हाण

जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडील थकीत एफआरपीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यावर चव्हाण यांनी चर्चेअंती शुक्रवारी हे आश्वासन दिले.

By

Published : Aug 15, 2020, 8:58 AM IST

थोडा वेळ द्या..! शेतकऱ्यांचा एकही रुपया ठेवणार नाही- अशोक चव्हाण
थोडा वेळ द्या..! शेतकऱ्यांचा एकही रुपया ठेवणार नाही- अशोक चव्हाण

नांदेड - थोडा वेळ द्या..! शेतकऱ्यांचा एकही रुपया ठेवणार नाही, असे आश्वासन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले आहे. जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडील थकीत एफआरपीच्या संदर्भात शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. यावर चव्हाण यांनी चर्चेअंती शुक्रवारी हे आश्वासन दिले.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलकांची बैठक झाली. त्यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. या आश्वासनानंतर स्वातंत्र्यदिनी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते प्रल्हाद इंगोले यांनी दिली आहे.

यावेळी पालकमंत्री यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची सखोल चर्चा झाली. यावेळी 25 सप्टेंबर पर्यंत थकीत एफआरपी देऊ अशी कारखान्याचे गणपतराव तिडके यांनी सांगितले. तर ऑगस्टच्या शेवटपर्यंत एफआरपी द्यावा, असा आग्रह प्रल्हाद इंगोले व सर्व सरपंचांनी धरला होता.

यावेळी ऊसदराबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हस्तक्षेप करत माझ्यावर थोडा वेळ द्या व विश्वास ठेवा शेतकऱ्यांचा रुपयाही ठेवणार नाही, अशी सकारात्मक भूमिका घेऊन लवकर पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

पालकमंत्री यांच्या निवासस्थानी ऊसाच्या एफआरपीसाठी पहिल्यांदाच बैठक

चेअरमन गणपतराव तिडके पहिल्यांदाच प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात एखाद्या सुनावणीसाठी किंवा चर्चेसाठी उपस्थित होते.तसेच ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी पहिल्यांदाच पालक मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरी बैठक होणे ही पहिलीच वेळ आहे. यावेळी साखर कारखानदारी सह इतरही शेतीच्या अनेक विषयावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान पालकमंत्री सतत स्थानिक व कमजोर कारखान्याशी पूर्ण करून त्यांच्या भावाकडे बघा असं म्हणत होते. त्यावर प्रल्हाद इंगोले म्हणाले साहेब तुमची तुलना स्थानिक कारखानदारांशी नको पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखानदारीसाठी त्याबरोबरीने हवी असे म्हणत चिमटाही काढला.

यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक बालाजी वांगे, कार्यालय अधिकारी प्रवीण वाडेकर, शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले व सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान कदम, सरपंच राम कदम सावरगाव चे सरपंच विजय जाधव, बामणी चे सरपंच सतीष कदम उपसरपंच राम कदम मुदखेड चे गोविंद गोपनपल्ले, भाऊराव कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, शामराव पाटील टेकाळे संचालक प्रवीण देशमुख, साहेबराव राठोड, कार्यकारी संचालक श्याम पाटील उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details