नांदेड- जिल्ह्यात आशा वर्कर यांना गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे मानधन मिळाले नसल्याने आशा वर्कर संघटनेने खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मानधन लवकर मिळवून देण्याची त्यांनी मागणी केली. नांदेड महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आशा वर्करचे ऑक्टोबर २०१८ पासून मानधन रखडले आहे.
नांदेडमधील आशा वर्करचे मानधन दीड वर्षापासून रखडले, हेमंत पाटलांची घेतली भेट
महिन्याला १ हजार ५०० रुपये मानधन असून तेदेखील वेळेवर मिळत नसल्याने या महिलांचे हाल होत आहेत. आशा वर्कर यांचे दीड वर्षांपासून रखडलेले मानधन देण्यात यावे, यासाठी खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना निर्देश दिले आहेत. मानधानच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे कळवण्यात येणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले आहे.
महिन्याला १ हजार ५०० रुपये मानधन असून तेदेखील वेळेवर मिळत नसल्याने या महिलांचे हाल होत आहेत. अशात मानधन मिळवून देण्याची शेकडो आशा वर्कर यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. या सर्व आशा वर्कर लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचे सर्व्हे करत असून त्यांना सुरक्षा कीटदेखील देण्यात यावे, अशी मागणीदेखील आशा वर्कर यांनी केली आहे.
आशा वर्कर यांचे दीड वर्षांपासून रखडलेले मानधन देण्यात यावे, यासाठी खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना निर्देश दिले आहेत. मानधानच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे कळवण्यात येणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले आहे.
TAGGED:
आशा वर्कर यांना मानधन