महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये विदेशी फळ भाजीचा प्रयोग; बीजोत्पादनातून लाखो रुपयांचा नफा

शेती हा व्यवसाय तोट्याचा असल्याची ओरड शेतकरी बांधवांकडून आपल्या कानांवर पडते. मात्र, नांदेड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जुकिनी या विदेशी भाजीची लागवड करून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.

zucchini
जुकिनी

By

Published : Jan 29, 2021, 12:03 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने 'जुकिनी'(zucchini) या विदेशी फळभाजीची यशस्वी शेती केली आहे. लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील संजय ताठे या शेतकऱ्याने हा प्रयोग यशस्वी केला. या पिकाच्या बीजोत्पादनातून त्यांनी आतापर्यंत लाखो रुपयांचा नफा कमावला आहे.

नांदेडमध्ये विदेशी फळ भाजीचा प्रयोग
मागील दोन वर्षांपासून सुरू आहे प्रयोग -संजय ताठे हे मागील दोन वर्षांपासून 'जुकिनी' या फळ भाजीची लागवड करत आहेत. बीज प्रक्रियेसाठी ते या भाजीची लागवड करत आहेत. अमेरिका या देशातील लोक मोठ्या प्रमाणात 'जुकिनी'चा भाजीसाठी उपयोग करतात. ताठे यांनी प्रयोग म्हणून या फळभाजीची लागवड केली. नांदेड जिल्ह्यातील वातावरणात देखील याभाजीचे उत्तम प्रकारे पीक येते आहे. या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कॅलरीज आणि खनिजे मिळतात, अशी माहिती ताठे यांनी दिली. बीज उत्पादनकरून वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांचा नफा -

आपल्या देशात जुकिनीचा खाण्यासाठी लोक वापर करत नसल्याने संजय ताठे फक्त त्याचे बीज उत्पादनकरून यातून वर्षाला दीड ते दोन लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत. जुकिनी या फळ भाजीला क्युकरबिटा पेपो (Cucurbita Pepo) तसेच कोर्गगेट (Courgette) या नावाने जगभरात ओळखले जाते. औषधी गुणधर्मामुळे ही फळभाजी अनेक आजारांवर रामबाण औषध म्हणून ओळखली जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details