नांदेड - नांदेड-भोकर रस्त्यावर पांढरवाडी येथे आज बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाटनूरचे विद्यमान उपसरपंच बच्चुराज देशमुख पाटनूरकर हे जागीच ठार झाले, तर त्यांची आई अंजनाबाई बळवंतराव देशमुख आणि बहिण कमलबाई भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नांदेड-भोकर मार्गावर एसटी बस आणि कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
बच्चुराज देशमुख आज सकाळी ११ वाजता आपली बहिण व आईसह पाटनूरहून नांदेडकडे कारने निघाले होते. पांढरवाडी फाटा येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने त्यांच्या गाडीला धडक दिली.
बच्चुराज देशमुख आज सकाळी ११ वाजता आपली बहिण व आईसह पाटनूरहून नांदेडकडे कारने निघाले होते. पांढरवाडी फाटा येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसने त्यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये उपसरपंच बच्चुराज देशमुख पाटनूरकर हे जागीच ठार झाले, तर त्यांची आई अंजनाबाई बळवंतराव देशमुख आणि बहिण कमलबाई साहेबराव भाले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
बच्चुराज देशमुख हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक होते. ते सध्या पाटनूरचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अचानक निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहेत. यासंदर्भातील अधिक तपास बारड पोलीस करीत आहेत.