नांदेड -जिल्ह्यात बुधवारी 1 हजार 372 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 883 तर अँटीजेनद्वारे 489 अहवाल बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 71 हजार 791 एवढी झाली असून यातील 55 हजार 980 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या 14 हजार 228 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 239 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तीन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 322 एवढी झाली आहे.
1 हजार 219 कोरोनामुक्त, 14,228 रुग्णांवर उपचार
बुधवारी 1 हजार 219 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. तर 14 हजार 228 बाधितांवर उपचार सुरु आहेत.