नागपूर : नागपूरात गेल्या पंधरा दिवसांपासून गुन्हेगारीचे सत्र सुरू असल्याचे समोर आले आहे. दारू पिण्याच्या वादातून तरूणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय उर्फ विजू असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून बबलू सत्रमवार असे आरोपीचे नाव आहे. मृत तरूण व आरोपीमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. यादरम्यान आरोपीने स्वतः जवळील चाकूने विजूच्या पायावर मारला. मात्र, उपचारादरम्यान तरूण विजूचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Nagpur Crime : दारू पिण्याच्या वादातून तरुणाची हत्या, 15 दिवसांमधील सहा हत्या; नागपूर हादरले
दारू पिण्याच्या वादातून तरूणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. मात्र, उपचारादरम्यान हत्या झालेल्या विजू या तरूणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. मागील 15 दिवसांमधील ही सहावी हत्या झाल्याने नागपूर परिसर हादरला आहे.
दारूवरून दोघांमध्ये वाद : आरोपी बबलू सत्राळकर आणि विजू दोघांना ही दारूचे व्यसन होते. दोघेही दारू पिण्यासाठी एकत्र येत असे. काल रात्री त्या दोघांनी दारू पिल्यानंतर भांडण सुरू केले. पैशाच्या आणि दारूच्या विषयावरून दोघांमध्ये भांडण सुरू असताना बबलूने विजूवर चाकूने वार केला, दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
15 दिवसात सहा हत्या:नागपूरात नवीन वर्षाच्या सुरूवातीला रक्तरंजित घटना घडत आहेत. अवघ्या पंधरा दिवसात सहा जणांची हत्या झाल्यामुळे नागपूरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खून, बलात्कार, दरोडा, लूटमार यांसह सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागपूर शहराची कायदा आणि सुव्यवस्था कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे. गेल्या पंधरादिवसांतील ही सहावी हत्या झाल्याची घटना आहे.
- पहिली घटना: १ जानेवारीला नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी पाचपावलीच्या वैशालीनगर सिमेंट रोडवर एका युवकाचा खून करण्यात आला. राजेश विनोद मेश्राम असे मृत युवकाचे नाव आहे तर मनोज नारायण गुप्ता, शुभम ऊर्फ दादू हिरामण डोंगरे, विपिन ऊर्फ जॅकी रामपाल विश्वकर्मा, पीयुष भैसारे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहे. राजेश मेश्राम वाहन चालक होता. त्याची मनोजशी जुनी ओळख होती. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता त्याचं वादातून राजेशची हत्या झाली.
- दुसरी घटना: ३ जानेवारीला वर्चस्वाच्या लढाईतून कुख्यात गुंड आसिफ ऊर्फ घोडा याचा पुतण्या व भाच्याने शेख फिरोज शेख मोईनुद्दीन याची हत्या केली. बिडीपेठेतील भारतमाता चौकात भरदिवसा हत्येचा थरार घडला. पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांनी गुंड आसिफचा भाचा मो. साकिब मो. सारिक अन्सारी आणि पुतण्या शेख फैज शेख फिरोज या दोघांना अटक केली. मृत फिरोज हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. भारतमाता चौकात त्याचा पानठेला होता. सात वर्षांपूर्वी आसिफ घोडा याने फिरोजच्या भावावर जीवघेणा हल्ला झाला होता.
- तिसरी घटना: ८ जानेवारी रोजी कळमना पोलीस स्टेशन हद्दीत घडली. कळमनामधील गुलमोहरनगर येथे दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या त्यामुळे निर्माण झालेल्या वादातुन अजय ऊर्फ लक्ष्मी नारायण चंदानिया (२२) नामक तरुणाची हत्या झाली आहे. आरोपी
विनय साहू याच्या भाच्याचा वाढदिवस होता त्याच्यासाठी तो केक आणण्यासाठी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अजयच्या दुचाकीसोबत त्याच्या दुचाकीची धडक झाली. दोघांच्या गाडीचे नुकसान झाले होते. मात्र, आरोपी अजयने विनय साहूकडे गाडीच्या नुकसानाची भरपाई मागितली. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी चिडलेल्या अजयने विनय साहूला मारहाण केली दोघांमध्ये हाणामारी सुरू असताना विनयने अजयवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे अजय रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला ज्यामुळे काही वेळात त्याचा मृत्यू झाला. - चौथी घटना: ८ जानेवारी रोजी नागपूरच्या हिंगणा भागातील श्रीकृष्ण नगरात आरोपीच्या घरीचं घडली आहे. अवैध धंद्यात सहकारी असलेल्या इसमाचे पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचा कारणावरून आरोपीने इसमाची गोळ्या घालून हत्या केली आहे. अविनाश अशोक घुमडे असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे तर दीपक घनचक्कर उर्फ खट्या असे आरोपीचे नाव आहे. मृतक आणि आरोपी दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. अवैध जुगार आणि गांजाची विक्री करायचे तसेचं सोबत राहायचे. मृतक आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्य बद्द्ल बोलल्याने झालेल्या वादातून आरोपीने साथीदारांच्या मदतीने अविनाश अशोक घुमडेवर दोन गोळ्या झाडून हत्या केली. घटेनची माहीती समजताचं हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आणि तपास सुरू केला आहे.
- पाचवी घटना: नागपूर शहरातील अजनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पार्वती नगर परिसरात कारागृहातुन पॅरोलवर बाहेर आलेल्या एका आरोपीने विकी चंदेल नावाच्या युवकाची हत्या केल्याची घटना घडली. राकेश पाली असे आरोपीचे नाव आहे,तो हत्येच्या प्रकरणात नागपूर कारागृहात कैद होता, काही दिवसांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपींचा राकेश पालीचा भाचा आणि मृतक विकी चंदेलचा काही वाद सुरू होता,त्याचं वादातून राकेशने विकीची निर्घृण हत्या केली.