नागपूर - शहरातील दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या पार्वती नगरमधील एका तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने महानगरपालिका प्रशासनाने तो परिसर सील केला आहे. या भागातील नागरिकांना विलगीकरण कक्षात पाठवण्यास सुरुवात केली आहे.
'त्या' तरुणाचा मृत्यू कोरोनामुळेच; पार्वती नगर परिसर सील
पार्वती नगरमधील एका 22 वर्षीय तरुणाला गंभीर अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्याची कोरोना चाचणी केली होती. मात्र, या चाचणीचा अहवाल येण्याआधीच त्या तरुणाचा मृत्यू झाला.

बुधवारी त्या तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिका प्रशासनाने पार्वती नगरचे निर्जंतुकीकरण करायला सुरुवात केली आहे. त्याच बरोबर त्या परिसरातील नागरिकांना क्वारंटाईन करून त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. किती नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, यासंदर्भात एकूण आकडा अद्याप पुढे आलेला नाही.