महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुढील तीन दिवस विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता

विदर्भ अवकाळी पावसासहपुढील तीन दिवस विदर्भासह राज्याच्या इतर भागाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली आहे. आज रात्री भंडारा, गोंदिया आणि नागपुरात पावसाला सुरुवात होईल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

विदर्भ अवकाळी पावसासह गारपीट
विदर्भ अवकाळी पावसासह गारपीट

By

Published : Feb 16, 2021, 6:40 PM IST

नागपूर - पुढील तीन दिवस विदर्भासह राज्याच्या इतर भागाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली आहे. आज रात्री भंडारा, गोंदिया आणि नागपुरात पावसाला सुरुवात होईल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्यासंदर्भातील उपाययोजना शेतकऱ्यांनी करावे, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

पुढील तीन दिवस विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात तापमान कमी होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. हवामान विभागानुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यात उद्या अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे सोबतच गारपीट देखील होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितला आहे. मध्य भारतात पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे,त्यामुळे केवळ विदर्भच नाही तर मराठवाड्याला सुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो. १७ आणि १८ तारखेला मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे.पिकांना फटका बसण्याची शक्यताथंडी कमी झाल्याने आता उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे पीक कापणीवर आलेले आहेत. यामध्ये गहू, हरभरा या सारख्या महत्त्वाच्या पिकांचा समावेश आहे. तर, संत्रा, मोसंबी सारख्या फळबागांचे देखील अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, अशी सूचना हवामान खात्याने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details