नागपूर - केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल गुरुवारी एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महालमध्ये जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्येही अर्धा तास चर्चा झाली.
पियुष गोयल नागपूर दौऱ्यावर, सरसंघचालक मोहन भागवतांची घेतली भेट
दोन दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केले होते. त्यामुळे वाणिज्य मंत्री म्हणून गोयल यांची भागवत यांच्यासोबत झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल
नागपुरात आल्यानंतर नेहमी मी रेशीमबाग येथील संघ कार्यालयात भेट देत असतो. त्यामुळे मला माझे काम अधिक चांगल्या रीतीने करण्याचे प्रोत्साहन मिळत असल्याचे पियुष गोयल म्हणाले.
दरम्यान, ते भाजपच्या विविध कार्यक्रमात देखील सहभागी झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केले होते. त्यामुळे वाणिज्य मंत्री म्हणून गोयल यांची भागवत यांच्यासोबत झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.