महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन मद्यपींच्या भांडणाचे रूपांतर खुनी हल्ल्यात, व्हिडिओ व्हायरल

सुरुवातीला अतिशय किरकोळ वाटत असलेल्या वादातून रुपचंदने पंकजवर कुऱ्हाडीने वार केले. गंभीर अवस्थेत जखमी असलेला पंकज शिव मंदिराच्या बाजूला असलेल्या बेंचवर कोसळला. अनेकांनी हा खुनी हल्ल्याचा थरार आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि ते जखमी पंकजची मदत करायला पुढे धावले असता, हातात कुऱ्हाड घेतलेल्या रुपचंदने त्यांची वाट अडवत धमकावणे सुरू केले.

By

Published : Mar 18, 2020, 7:59 AM IST

Updated : Mar 18, 2020, 9:33 AM IST

नागपूर
नागपूर

नागपूर - शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गंगाबाई घाट परिसरात दोन मद्यपींच्या भांडणाचे थरारनाट्य नागरिकांना अनुभवायला मिळाला. दारूच्या नशेत जीव घेण्यासाठी आतूर झालेल्या रुपचंद चंद्रवंशी नावाच्या मद्यपीने पंकज घोळींदे नावाच्या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. पंकजला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर भर रस्त्यात हातात कुऱ्हाड घेऊन लोकांना धमकवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार तिथे उपस्थित लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

दोन मद्यपींच्या भांडणाचे रूपांतर खुनी हल्ल्यात

रुपचंद चंद्रवंशी आणि पंकज घोळींदे हे दोन्ही मद्यपी मित्र आहेत. रुपचंद आणि पंकज यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. सुरुवातीला अतिशय किरकोळ वाटत असलेल्या वादातून रुपचंदने पंकजवर कुऱ्हाडीने वार केले. गंभीर अवस्थेत जखमी असलेला पंकज शिव मंदिराच्या बाजूला असलेल्या बेंचवर कोसळला. अनेकांनी हा खुनी थरार आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि ते जखमी पंकजची मदत करायला पुढे धावले असता, हातात कुऱ्हाड घेतलेल्या रुपचंदने त्यांची वाट अडवत धमकावणे सुरू केले.

हेही वाचा -Coronavirus : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागपूरमध्ये जमावबंदी लागू

रक्तबंबाळ झालेला पंकज तीव्र रक्तस्त्रावाने मृत्युमुखी पडेल म्हणून लोकांनी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यावर रुपचंदने त्यांच्यावरही हल्ला करण्याचा पवित्रा घेतला. लोकांनी बांबू, काठी दाखवत रुपचंदला घेरून ठेवले आणि पळून जाण्यास मज्जाव केला. त्याच्या अंगावर गरम पाणी आणि सायकली फेकून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेला रुपचंद काही केल्या मागे हटायला तयार नव्हता. सुमारे २० मिनटे हा थरार सुरू असताना कोणी तरी पोलिसांना माहिती दिली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हिंमत दाखवत हातात कुऱ्हाड घेतलेल्या रुपचंदवर झडप घातली आणि त्याला ताब्यात घेतले. चिडलेल्या जमावाने हल्लेखोर रुपचंदला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून सोडवत पोलीस ठाण्यात नेले. जखमी पंकजला रुग्णालयात दाखल केले असून रुपचंद चंद्रवंशी विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Last Updated : Mar 18, 2020, 9:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details