नागपूरनागपूर पांढरकवडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44वर दुचाकीने जात असलेल्या दाम्पत्याला ट्रकने चिरडले ( couple crushed by truck ). यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास करंजी रोड महामार्गावर (Accident on Karanji Road Highway ) घडली. गोकुलदास शामराव लांडगे वय 55 व त्यांची पत्नी सुनीता गोकुलदास लांडगे वय 45 दोघेही राहणार वैशाली नगर गडचांदूर जिल्हा चंद्रपूर असे मृत पतीपत्नीचे नावे आहेत.
Road Accident : ट्रकने दुचाकीस चिरडले; पती पत्नी ठार
नागपूर पांढरकवडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44वर दुचाकीने जात असलेल्या दाम्पत्याला ट्रकने चिरडले ( couple crushed by truck ). यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लायसन्सच्या प्रतीवरून मृतकाची पटली ओळख :राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44वर असलेल्या करंजी रोड येथे दुचाकी क्रमांक एमएच 34 बी एक्स 6739 हे पांढरकवडाच्या दिशेने जात असताना मागून येत असलेला कानपूरवरून हैदराबादच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक युपी 92 टी 3569 याने दुचाकीस जोरदार धडक देत चिरडले. यात दुचाकी चालक गोकुलदास व त्यांची पत्नी सुनीता हे गंभीररित्या जखमी झाले. यामध्ये गोकूलदास हे जागीच गतप्राण झाले. त्यांची पत्नी दवाखान्यात नेत असताना मृत पावली. घटनास्थळावरून मिळालेल्या आधार कार्ड, पॅन कार्ड व दुचाकी लायसन्सच्या प्रतीवरून मृतकाची ओळख पटली आहे.
आरोपी ट्रक ड्रायव्हर हा ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार :घटनेची माहिती मिळताच करंजी रोड महामार्ग मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक संदीप मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वसुकार, हेड कॉन्स्टेबल शेख साजिद व अनिल जिरकर यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमी महिलेला पांढरकवडा येथे उपचारार्थ नेले. मात्र तिने वाटेतच जीव सोडला. घटना घडताच करंजी महामार्गावर बघण्यासाठी गावकऱ्यांची एकच गर्दी जमली घटनास्थळावर मृतकाचा मृतदेह पडून होता. तर मृतकास ट्रकने चिरडल्यामुळे जागोजागी रक्ताचा व मासाचा सडा पडून होता. घटनेनंतर ट्रकच्या मध्ये दुचाकी अडकल्याने आरोपी ट्रक ड्रायव्हर हा ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला. परिणामी ट्रकला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर महामार्ग मदतकेंद्र करंजी तसेच पांढरकवडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल होत त्यांनी घटनेच्या पंचनामा केला. त्यानंतर लोकांच्या मदतीने मृतकास उचलून उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे पाठवण्यात आले. अधिक तपास पांढरकवडा पोलिस करीत आहेत.