नागपूर- अमेरिकेतील वाघाला कोरोना झाल्याची बातमी पुढे आल्यानंतर आता नागपुरात प्राण्यांच्या उपचारासाठी सज्ज असलेले अत्याधुनिक ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरला पूर्णपणे सॅनिटाईझ करण्यात आले आहे. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये जखमी आणि आजारी वन्यप्राण्यांवर उपचार केले जातात. या ठिकाणी वन्यजीवांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचादेखील वावर असतो. त्यामुळे संपूर्ण ट्रीटमेंट सेन्टर, कार्यालय, पिंजरे, रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका सॅनिटाईझ करण्यात आहे आहे.
अमेरिकेत वाघाला कोरोना झाल्याची माहिती पुढे येताच 'ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्र' सॅनिटाईज
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये जखमी आणि आजारी वन्यप्राण्यांवर उपचार केले जातात. या ठिकाणी वन्यजीवांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचादेखील वावर असतो. त्यामुळे संपूर्ण ट्रीटमेंट सेन्टर, कार्यालय, पिंजरे, रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका सॅनिटाईझ करण्यात आहे आहे.
एखादा वन्यजीवाला कुठून आणि कुठल्या परिस्थितीत वाचवून आणतो याची फारसी माहिती उपलब्ध नसते. सध्या कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने वन्यजीवांसोबतच पशुवैद्यकीय अधिकारी, परिचारक आणि रेस्क्यू टीमचे कर्मचारी यांना धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने आज ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टरला सॅनिटाईज करण्यात आले आहे. अमेरिकेतील एका प्राणी संग्रहालयातील एका वाघाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्या अनुषंगाने आणि केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण व महाराष्ट्र प्राणी संग्रहालय मंडळ यांच्या मार्गदर्शक सुचनेच्या आधारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.