नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेली महाजनादेश यात्रा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या गृह शहरात दाखल होत आहे. महायात्रेच्या स्वागताकरीता शहर भाजपने जय्यत तयारी केली आहे. ठिक-ठिकाणी स्वागताचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज नागपुरात; यात्रेवर पावसाचे संकट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेली महाजनादेश यात्रा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या गृह शहरात दाखल होत आहे. मुख्यमंत्री 12 ते 15 किलोमीटर अंतराचा रोड शो करणार आहे. मात्र सकाळपासूनच नागपूर शहरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने या यात्रेवर संकट निर्माण झाले.
या महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्री 12 ते 15 किलोमीटर अंतराचा रोड शो करणार आहे. तसेच काटोल आणि सावनेर येथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. काटोल आणि सावनेर मतदारसंघामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. भाजप सोडून गेलेले आशिष देशमुख यांनी काटोल-नरखेड मतदारसंघातून आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर सावनेर-कळमेश्वर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार सुनिल केदार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या सभा महत्वाच्या ठरणार आहे. मात्र सकाळपासूनच नागपूर शहरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने या यात्रेवर संकट निर्माण झाले आहे.