नागपूर : मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन आला होता. एका व्यक्तीने रागाच्या भरात नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला हा फोन केला. त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेब बॉम्ब ठेवल्याचे सांगतिले असून नागपूर पोलीस कंट्रोल रूमला काॅल करून थेट धमकी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.
वीज गेली म्हणून रागाच्या भरात बॉम्ब ठेवल्याचा फोन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी आणि खंडणी देण्याचे प्रकरण अगदी ताजे असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. फोन करणारी व्यक्ती नागपूरच्या कन्हान भागातील राहते. घरची वीज गेली म्हणून या व्यक्तीने रागाच्या भरात थेट फोन केला आणि सांगितले की, फडणवीस यांच्या घरी बॉम्ब ठेवला आहे. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
Bomb Outside Devendra Fadnavis House : फडणवीसांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब? धमकीचा फोन; एक ताब्यात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी आणि खंडणी देण्याचे प्रकरण अगदी ताजे असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गडकरींना खंडणी मागणारा पोलिसांच्या ताब्यात :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कारागृहातून धमकी देणाऱ्या जयेश कांथा उर्फ पुजारीला अखेर नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयेश पुजारीने सर्वात आधी १४ जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तीन फोन करून शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी पुन्हा आरोपीने दहा कोटींची खंडणी मागितली होती.
१० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती : पोलिसांनी बेळगाव तुरुंगात सर्च ऑपरेशन राबवत दोन सिमकार्ड जप्त केल्यानंतर आज जयेश कांथा उर्फ पुजारीला अटक करून नागपूरला आणले आहे. कर्नाटकच्या बेळगावमधील हिंडलगा जेलमध्ये असलेल्या जयेश पुजाराला एका प्रकरणात आरोपी जयेशला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कारागृहामधूनच जयेशने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करून १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.