नागपूर -अल्पवयीन मुली कोणत्या कारणाने घर सोडून पलायन करतात ( The rate of children leaving home in Nagpur ) याचा गंभीरपणे विचार केला असता काही प्रमुख करण समोर आले आहेत. ( citizens missing from Nagpur city ) त्यामध्ये बाह्यजगाचे आकर्षण, प्रेमाची माहिती घरच्यांना कळल्याने, शिक्षणाची भीती, यासह पालकांकडून छळ या कारणांनी अल्पवयीन मुली पालकांच्या विरोधात ( Missing boys and girls from Nagpur city ) जाऊन पळून जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
स्मार्टफोन, समाजमाध्यमे जबाबदार - अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात स्मार्टफोन आले आहेत,त्या स्मार्टफोनचा वाढता उपयोग अत्यंत धोकादायक ठरूतो आहे. मोबाईलसह टीव्ही आणि चित्रपटांमुळे समाजमाध्यमांमुळे अल्पवयीन मुला-मुलींमध्ये शारीरिक आकर्षण वाढत आहे. ( Missing girls ) त्यालाच ते प्रेम समजू लागतात. त्यातून ते पळून जाण्यासाठी प्रेरित होतात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शाळकरी मुली भावनेच्या भरात घर सोडतात -महत्त्वाचे म्हणजे शाळकरी मुलींना प्रेमाच्या जाळय़ात अडकवण्याचे प्रमाणही जास्त आहे. शाळेतील मुली भविष्याचा फारसा गांभीर्याने विचार करीत नाही. केवळ भावनेच्या भरात मुली पळून जाण्यास तयार होतात.
सात वर्षांत 3 हजार पेक्षा अधिक मुला-मुलींचे पलायन - गेल्या सात वर्षांत १२ ते १९ या वयोगटातील मुले- मुली हरवण्याचे किंवा घरातून पळून जाण्याचे प्रमाण वेगाने वाढले आहे. गेल्या सहा वर्षांत उपराजधानी नागपूरातून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. सुदैवाने यापैकी बहुतेक मुली सुखरूपरित्या घरी परतल्या आहेत.
अल्पवयीन घर सोडण्यांचे प्रमुख कारणे -अल्पवयीन लहान मुले घर सोडून पलायन का करतात या कारणांचा शोध घेतला तेव्हा काही ठराविक बाबी समोर आल्या आहेत,त्यामध्ये पालकांकडून मुलांवर अभ्यास सक्ती करणे, आई-वडिलांकडून मुलांचा सतत द्वेष करणे, लहान मुलांमध्ये मोठय़ा शहरांचे असलेलं प्रचंड आकर्षण,घरात मोठय़ांमध्ये सततचे होणारे वाद,चित्रपटाप्रमाणे रंगविलेले स्वप्न यासह प्रेम प्रकरणात देखील अल्पवयीन घर सोडून जातात अशी माहिती समोर आली आहे.
सात वर्षातील आकडे काय सांगतात?गेल्या सात वर्षात तीन हजार अल्पवयीन मुले आणि मुलींनी घर सोडले होते.२०१६ या वर्षांत १८५ मुले आणि ३२९ मुली बेपत्ता झाल्या होत्या. २०१७ साली १८६ मुले तर ३७३ मुलीं घर सोडून पळाल्या. वर्ष २०१८ मध्ये १५४ मुलं तर ३५७ मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. २०१९ यावर्षी १६५ मुले तर ३८१मुली हरवल्या होत्या. कोरोनाच्या दरम्यान २०२० साली या संख्येत काहीशी घट नोंदवण्यात आली आहे. २०२० ला ९३ मुले आणि २५१ अल्पवयीन मुली हरवल्याची नोंद आहे. २०२१ मध्ये ९९ मुलं आणि ३१६ मुली बेपत्ता झाल्या होत्या,या वर्षी हा आकडा कमी झाला असून आत्ता पर्यंत १२० मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे.