नागपूर -ढगाळ वातावरण पूर्णपणे संपले असून आकाश निळे-शुभ्र झाले असल्याने आता नागपूरसह विदर्भात पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले आहे. तर, शनिवार रात्रीपासूनच गारठा वाढला असल्याने पुढील दिवसांमध्ये तापमान आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच दमदार पावसाचे आगमन झाले होते. नागपूरसहित विदर्भात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. शेतातील संत्रा, गहू, चना, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता मात्र, पावसाने उसंत घेतली असून ४ दिवसानंतर अखेर शनिवारी नागपूरकरांना सूर्याचे दर्शन झाले.