महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Teacher Constituency Election : सलग तिसऱ्यांदा शिक्षक परिषदेकडून 'गाणार' यांना उमेदवारी; भाजपचे वेट अँड वॉच

शिक्षक परिषदेने भाजपसोबत बोलणी सुरू होण्यापूर्वीचं वर्तमान शिक्षक आमदार ना. गो गाणार ( Current teacher will MLA ganar ) यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली ( Teacher Constituency Election ) आहे. त्यामुळे मात्र भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यां उमेदवारांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

By

Published : Oct 27, 2022, 7:27 PM IST

Teacher Constituency Election
Teacher Constituency Election

नागपूर :पुढील वर्षाच्या सुरुवातीचं नागपूर विभागातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. यावेळी तरी भारतीय जनता पक्षाकडून ( Bharatiya Janata Party ) आपला देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. शिक्षक परिषदेने भाजपसोबत बोलणी सुरू होण्यापूर्वीचं वर्तमान शिक्षक आमदार ना. गो गाणार ( Current teacher will MLA ganar ) यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मात्र भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यां उमेदवारांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, शिक्षक परिषदेकडून ना गो गाणार यांच्या उमेदवारीला समर्थना बद्दल पत्र प्राप्त झाले आहे. यावर पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर निर्णय घेऊ अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

Teacher Constituency Election

सलग तिसऱ्यांदा ना गो गाणार यांना उमेदवारी जाहीर :गेल्या दोन निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने शिक्षक परिषदेचे उमेदवार ना गो गाणार यांना समर्थन दिल्यामुळे ते दोनदा शिक्षक आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र,भाजप यावेळी पक्षातील शिक्षक उमेदवाराला निवडणूकीच्या रणांगणात उतरवले अशी चर्चा जोर धरत होती. त्यापूर्वीचं शिक्षक परिषदेकडून सलग तिसऱ्यांदा ना गो गाणार यांना उमेदवारी जाहीर करून भाजपच्या इच्छुकांना जोरदार धक्का दिला आहे. भाजप यावेळी नागो गाणार विरुद्ध आपला उमेदवार उतरवले का याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते ना गो गाणार यांना समर्थन देण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे.

Teacher Constituency Election


भाजपच्या समर्थनाची मला अपेक्षा :या संदर्भात शिक्षक आमदार ना गो गाणार यांना संपर्क केला असता, ते म्हणाले की भाजप माझे समर्थन करेल असा विश्वास आहे. पुढील काही दिवसात यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details