नगपूर -विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष तयारी करत आहे. शिवसेनेतर्फेही ग्रामीणमधील सहा मतदारसंघात मेळावे घेतले जाणार आहेत. येत्या २५ तारखेपासून उमरेड, हिंगणा, कामठी, रामटेक, काटोल आणि सावनेर मतदारसंघात सेनेचे मेळावे होणार आहे.
मुखमंत्र्यांच्या जिल्ह्यात शिवसेना घेणार कार्यकर्ता मेळावे
शिवसेनेतर्फे नागपूर ग्रामीणमधील सहा मतदारसंघात मेळावे घेतले जाणार आहेत. येत्या २५ तारखेपासून उमरेड, हिंगणा, कामठी, रामटेक, काटोल आणि सावनेर मतदारसंघात सेनेचे मेळावे होणार आहे.
माजी आमदार आशिष जैसवाल
"युती न झाल्यास स्वबळावर लढण्यासाठी आमची तयारी आहे, म्हणून हे मेळावे आम्ही घेणार आहेत. युती झाल्यास युतीच्या उमेदवारासाठी हे मेळावे असतील", अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार आशिष जैसवाल यांनी दिली आहे. मुखमंत्र्यांच्याच जिल्ह्यात शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार असल्याने चर्चांना उधान आले आहे. भाजप-सेना युती झाल्यास रामटेक आणि काटोल या दोन जागा सेनेला मिळाव्यात अशी इच्छा देखील जैसवाल यांनी व्यक्त केली आहे.