महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या भाजपच्या धोरणाला उदित रांज यांचा विरोध

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दलित नेते उदित राज नागपूरला आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सारकरच्या आर्थिक धोरणांवर कडाडून टीका केली व सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी भाजपच्या धोरणावर त्यांनी टीका केली आहे.

By

Published : Oct 15, 2019, 6:18 PM IST

पत्रकारांना संबोधन करताना दलित नेते उदित राज

नागपूर- भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये सावरकरांना भारतरत्न मिळावा, याकरिता शिफारस करणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र यावर काँग्रेस नेते उदित राज यांनी टीका केली आहे. इंग्रजांची वारंवार माफी मागणारे सावरकर भाजपसाठी देशभक्त झाल्याचा गंभीर आरोप उदित राज यांनी केला आहे.

पत्रकारांना संबोधन करताना नेते उदित राज

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेते उदित राज नागपूरला आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी भाजपच्या आश्वसनावर त्यांनी कडाडून टीका केली आहे. पुढील काही वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेला अतिशय वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. जागतिक मंदीचे सावट भारतात आणखी गडद होणार असल्याची भीती उदित राज यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-नागपुरात दोन ठिकाणाहून १ कोटीची रक्कम जप्त

सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. स्वतंत्र लढाईच्या काळात सावरकरांनी अनेक वेळा इंग्रजांची माफी मगितली आहे. अशा व्यक्तीला भारतरत्न देण्याची शिफारस भाजपकडून केली जाणार आहे. हे निंदनीय असल्याचे उदित राज म्हणाले.

हेही वाचा-नागपूर : बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध बांधवांचा दीक्षाभूमीवर महासागर

ABOUT THE AUTHOR

...view details