नागपूर- जगभरात सध्या कोरोनाची दहशत असून याचे लोण आता शहरात देखील पसरले आहे. कोरोनाचा विषाणू उष्ण वातावरणात टिकाव धरत नाही, त्यामुळे राज्यात त्याचा धोका नसल्याचे तज्ञांचे मत आहे. तरी देखील सामान्य नागरिक कोरोनामुळे धास्तावले आहे. त्यामुळे, कोरोना पासून बचावासाठी एन ९५ मास्कची मागणी वाढली आहे. मात्र, शहरात या मास्कचा तुटवडा असून त्याची किंमतही वाढली आहे.
नागपुरात कोरोनाच्या धसक्याने एन ९५ मास्कच्या किमती वाढल्या
एन ९५ मास्कच्या वापराने कोरोनापासून बचाव शक्य असल्याने या मास्कला बाजारात मोठी मागणी आहे. आधी ५० रुपयात मिळणारे एन ९५ मास्क आता १५० ते २०० रुपयाला विकले जात आहे. मात्र, तरी देखील या मास्कचा तुटवडा जाणवत आहे.
एन ९५ मास्कच्या वापराने कोरोनापासून बचाव शक्य असल्याने या मास्कला बाजारात मोठी मागणी आहे. आधी ५० रुपयात मिळणारे एन ९५ मास्क आता १५० ते २०० रुपयाला विकले जात आहे. या मास्कचा तुटवडा देखील जाणवत आहे. ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर एन ९५ सोबतच साधे मास्क वापरतात. मात्र, मास्कचा तुटवडा असल्याने यावर सरकारने उपाय न आखल्यास इतर शस्त्रक्रियांकरिता डॉक्टरांना देखील मास्क उपलब्ध होणार नसल्याची भीती सर्जिकल विक्रेते विनोद टावरी यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात मास्क विक्रीचा आढावा घेत विनोद टावरी यांच्या सोबत संवाद साधला 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी.
हेही वाचा-तब्बल अकराशे किलोची साबुदाणा खिचडी...