नागपूर : रांचीहून पुण्याला (रांची-पुणे) जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर, विमानातील क्रू मेंबर्सच्या माहितीनंतर, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग नागपूर विमानतळवर करण्यात आले आहे. या वृद्धाचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग - मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान रांचीहून पुण्याला जात असतांना ही घटना घडली आहे. शुक्रवारी रांची-पुणे इंडिगो विमानामध्ये 73 वर्षीय प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. क्रू मेंबरने याबाबत पायलटला माहिती दिली. यानंतर विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वृद्धांला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयाचे निवेदन :प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मृतदेह इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. KIMS-किंग्सवे हॉस्पिटलचे डेप्युटी जनरल (कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी सांगितले की, रुग्णाला हृदयविकाराचा झटका विमानात आला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.
दिल्लीहून दोहाला विमानाचे आपत्कालीन लँडिंग :अशीच घटना 13 मार्च रोजी दिल्लीहून दोहाला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे कराचीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे विमान कराचीला वळवण्यात आले होते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीहून दोहाला जाणारे इंडिगो एअरलाइनचे विमान रविवारी रात्री एक प्रवासी आजारी पडल्याने कराचीला वळवण्यात आले होते. विमान कराचीत उतरल्यानंतर प्रवाशाला मृत घोषित करण्यात आले. कराचीत विमान उतरल्यानंतर अब्दुल्ला (60 वर्षे) या नायजेरियन नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विमान A320-271N कराची विमानतळावर सुमारे पाच तास अडकले होते. कराचीतील अधिकाऱ्यांनी प्रवाशाचे मृत्यू प्रमाणपत्र जारी केल्यानंतर तसेच सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर विमान दिल्लीला परतले होते.
प्रवाशी मृत घोषित :कराचीतील नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, उड्डाणादरम्यानच प्रवाशाची प्रकृती खालावली होती. विमानाच्या कॅप्टनने कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याची विनंती केली होती. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना उपचारासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, प्रवाशाचा मृत्यू झाला होता. प्रवाशाचे मृत्यू प्रमाणपत्र जारी झाल्यानंतर, सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर विमान दिल्लीला परतले होते.
हेही वाचा - Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र सरकार बरखास्त करा; कर्नाटकच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची केंद्राकडे मागणी, कारण काय तर....