महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी होईल, राहुल गांधीचा मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली खोटी आश्वासने काँग्रेस पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी होईल त्यावेळी ते तुरुगांत असतील असेही गांधी यावेळी म्हणाले. नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी नागपुरात आले होते.

By

Published : Apr 4, 2019, 7:34 PM IST

Updated : Apr 4, 2019, 10:15 PM IST

नागपुरात राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली खोटी आश्वासने काँग्रेस पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. आम्ही १४ कोटी लोकांना आम्ही गरीबीतून बाहेर काढले मात्र, मोदी सरकारने पुन्हा त्यांनी गरिब केले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी होईल त्यावेळी ते तुरुगांत असतील असेही गांधी यावेळी म्हणाले.

नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी मोदींसह भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधाला. मी दोन तीन दिवसांचे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, मला आयुष्यभर सेवा करायची आहे. काँग्रेस गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करेल असेही गांधी म्हणाले. काँग्रेसचे सरकार आले तर आम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये वर्षाला ७२ हजार देऊ असे आश्वासनही यावेळी राहुल गांधी यांनी दिले. ते ७२ हजार महिलांच्या खाथ्यात जातील. माझे जनतेशी जवशचे नाते आहे. मोदींचे वय झाले आहे, मला अजून खूप काम करायचे आहे.

रापेल प्रकरणावरुनही राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राफेल प्रकरणाचे सत्य मनोहर पर्रिकरांना माहित होते पण ते गप्प राहिले. : देशासमोर असणारे बेरोजगारी, भष्ट्राचार आणि शेतकरी आत्महत्या यासंदर्भात मोदी सरकारने काय केले ते देशाला सांगावे. मोदींनी गुरू लालकृष्ण अडवाणींचाही अपमान केला आहे.

Last Updated : Apr 4, 2019, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details