नागपूर -नागपूर महामेट्रोचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी, मेट्रोच्या फेज 2 साठी यंदाच्या बजेटमध्ये 5976 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पैशातून महामेट्रोचा विस्तार होणार असून, मेट्रोच्या जाळ्याचा ग्रामीण भागात विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागपूर मेट्रोसाठी अर्थसंकल्पात तरतूद, प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
नागपूर महामेट्रोचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी, मेट्रोच्या फेज 2 साठी यंदाच्या बजेटमध्ये 5976 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पैशातून महामेट्रोचा विस्तार होणार असून, मेट्रोच्या जाळ्याचा ग्रामीण भागात विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
दरम्यान सध्या मेट्रोने प्रवास करताना अत्यंत माफक दर आकारला जातो, त्यामुळे मेट्रोन प्रवास करने सामान्य नागरिकांना सोईचे ठरते. आता अर्थसंकल्पामध्ये नागपूर मेट्रोच्या फेज 2 साठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मेट्रोचा ग्रामीण भागात देखील विस्तार होणार आहे. यामुळे नागपूरच्या बाहेर राहणाऱ्या प्रवाशांना देखील नागपूरमध्ये अल्पदरात येता येईल, व दळण वळणाची व्यवस्था देखील अधिक मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.