नागपूर- मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या बंदीवानांनी दिवाळीनिमित्य हजारो आकर्षण पणत्या (दिवे) तयार केल्या आहेत. एवढच नाही तर कैद्यांनी तयार केलेल्या लाकडी वस्तू ज्यामध्ये टेबल, टिपॉय, मंदिर, शर्टस, साडीसह हजारो वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तू विक्रीसाठी कारागृहाच्या विक्री आणि प्रदर्शनी केंद्रात उपलब्ध झाल्या आहेत. अतिशय अल्पदरात पणत्या आणि इतर वस्तू विकल्यात जात असल्याने नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.
कैद्यांनी तयार केलेल्या पणत्यांनी यंदाची दिवाळी तेजोमय होणार
मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या बंदीवानांनी दिवाळी निमित्य हजारो आकर्षण पणत्या (दिवे) तयार केल्या आहेत.
नागपूरकरांना यंदाची दिवाळी खास बनवण्याची संधी मिळाली आहे. चिनी वस्तू वापरून दिवाळी साजरी करण्याऐवजी आपल्या लोकांनी मेहनतीने तयार केलेली वस्तू वापरून दिवाळीचा आनंद द्विगुणित करायला मिळणार आहे. जीवनातील एक चूक केल्यानंतर त्याची शिक्षा भोगताना माणूस म्हणून स्वतःला घडवण्याऱ्या या हातांनी तुमची दिवाळी विशेष करण्यासाठी गेली अनेक महिने मेहनत घेतली आहे. नागपूर केंद्रीय कारागृहातील कैद्यानी त्यांच्यासाठी खास दिवाळीनिमित्त आकर्षक पणत्या आणि शेकडो समानांची निर्मिती केली आहे. कैद्यांना समाजात पुन्हा सामावून घेण्यासाठी असे उपक्रम अवश्यक आहेत. कैद्यांनी स्वतःला अशा उपक्रमांमध्ये गुंतविले तर ते गुन्हेगारी जीवनाचा इतिहास मागे सोडून सुंदर भवितव्य घडवण्यासाठी धडपड करतील, असा उद्देश या उपक्रमाचा आहे. भविष्यात कैद्यांच्या जीवनात आर्थिक सक्षमता यावी यासाठी कारागृह प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.