नागपूर : इन्फॉर्मेशनसाठीचे अत्यंत महत्त्वाचे कॉल सेंटर आहे. डायल 121 चे प्राइमरी कॉल सेंटर नवी मुंबईला तर सेकंडरी कॉल सेंटर नागपूरच्या लकडगंज येथे आहे. डायल 121 वर राज्याच्या वेगवेगळे भागातून कॉल येतात. पहिल्यांदा कॉल इतर प्रायमरी कॉल सेंटरवर जातो, त्यानंतर तो कॉल सेकंडरी कॉल सेंटरवर जातो. नागपूर येथे सेकंडरी कॉल सेंटरवर काल दुपारी एक कॉल आला होता. कॉलची सर्व संबंधित मुंबई पोलिसांशी संबंधित असल्यामुळे माहिती मुंबई कंट्रोल रूमला कळवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नागपूर शहर पोलिसांना आणखी कोणताही माहिती नाही अस पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले आहेत.
डायल १२१ राज्य पोलीस नियंत्रित करते :कॉलबद्दल आम्हाला काही माहिती नाही. त्याबद्दल मुंबई पोलीस टिपणी करू शकतात. डायल 121 चे कॉल सेंटर हे पोलीस आयुक्तालया अंतर्गत नसते तर राज्य पोलीस मुख्यालय कडून हे पूर्ण नियंत्रित केल्या जाते. एका गुंडाने जेलमध्ये बसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण अगदी ताजं असताना आता नागपूर येथील डायल 121 कॉल सेंटरला एक निनावी फोन आला होता,ज्यामुळे मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. फोन कुणी केला याचा शोध मुंबई पोलीस कसून घेत आहेत कारण पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने थेट उद्योगपती मुकेश अंबानी, महानायक अमिताभ बच्चन तसेच अभिनेता धर्मेंद्र घर उडवून देण्याची धमकीचं दिली आहे. धमकी देणारा व्यक्ती कोण आहे, त्याने कुठून फोन केला आणि धमकी देण्यामागे त्याचा उद्देश काय याचा शोध नागपूर पोलिसांनी सुरू केला आहे. कॉल करणारा ट्रेस झाल्यानंतरचं या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.