नागपूर- देशात एकाच वेळी ९ मिनिटांसाठी लाईट बंद केल्यानंतर सेंट्रल ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर फेल होण्याची शक्यता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. त्यावर भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. नितीन राऊत हे तांत्रिक कारण सांगून जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
"नितीन राऊत हे तांत्रिक कारण सांगून जनतेला पंतप्रधानांच्या आवाहनापासून दूर करताहेत"
नितीन राऊत केवळ तांत्रिक कारण सांगून जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांकरिता सर्व लाईट्स बंद करून नागरिकांना दिवे, मेणबत्ती आणि टॉर्च सुरू करायचे आहेत. यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेत नागरिकांनी घरातील लाईट्स बंद न करता दिवे, मेणबत्ती आणि मोबाईल टॉर्च सुरू करावे, असे म्हटले होते. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यानुसार सर्व देशात व राज्यात एकाच वेळी लाईट बंद केले, तर विजेची डिमांड एकदम कमी होईल, ज्यामुळे वीजनिर्मिती व पुरवठा यातील गणित बिघडेल. त्यामुळे, सेंट्रल ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर फेल होण्याची शक्यता वाढेल. सेंट्रल पॉवर ग्रीड फेल झाल्यास ती पूर्ववत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत रुग्णालयांचीदेखील वीज जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा काळजीपूर्वक पुनर्विचार करावा, अशी विनंती नितीन राऊत यांनी केली होती. यावर नितीन राऊत हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा-नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा फेरविचार करावा; उर्जामंत्री नितीन राऊत यांची विनंती