महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नितीन गडकरींच्या मतदारसंघातील लोकांचा मतदानावर बहिष्कार

कळमना भागातील प्रभाग क्रमांक ४ मधील राहिवास्यानी ११ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

By

Published : Mar 16, 2019, 8:23 PM IST

कळमना भागातील लोकांचा मतदानावर बहिष्कार

नागपूर- कळमना भागातील प्रभाग क्रमांक ४ मधील राहिवास्यानी ११ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक ४ हा नितीन गडकरींच्या मतदारसंघातील भाग आहे. यावेळी या लोकसभेसाठी काँग्रेसकडून नाना पटोले आणि भाजपकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवत आहेत.

कळमना भागातील लोकांचा मतदानावर बहिष्कार

प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १८ वर्षांपासून प्रत्येकवेळी रस्त्याची मागणी करुनही रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी प्रभागातील नागरिकांनी अनेकवेळा नगरसेवक आणि अमदारांकडे मागणी केली. मात्र, अद्याप येथील रस्त्याचे काम झाले नाही. येथे लोकप्रतिनिधींनी दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला निवेदन दिले आहे. या ठिकाणी लोकांनी घरासमोर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे फलकही लावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details