महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nilgai Hunting Nagpur : विजेचा करंट लावून निलगाईची शिकार; आरोपीसह तीन शिकाऱ्यांना अटक

नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या हिंगणा येथील काजली परिसरात विजेचा करंट लावून निलगाईची शिकार ( Nilgai Hunting in Hingna Nagpur ) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ( Nilgai Hunting through Electric Current Hingna Nagpur ) घटनेची माहिती समजताच वन विभागाच्या पथकाने कारवाई ( Nagpur Forest Department ) करत अशोक काशिनाथ कुकडकर यांना अटक केली आहे.

Nilgai Hunting through electric currect accused arresed nagpur
विजेचा करंट लावून निलगाईची शिकार; आरोपीसह तीन शिकाऱ्यांना अटक

By

Published : Feb 22, 2022, 3:39 PM IST

नागपूर -शहराच्या शेजारी असलेल्या हिंगणा येथील काजली परिसरात विजेचा करंट लावून निलगाईची शिकार ( Nilgai Hunting in Hingna Nagpur ) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ( Nilgai Hunting through Electric Current Hingna Nagpur ) घटनेची माहिती समजताच वन विभागाच्या पथकाने कारवाई ( Nagpur Forest Department ) करत आरोपी अशोक काशिनाथ कुकडकरला अटक केली.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती, की मौजा काजळी सर्व्हे कं. 50 येथे विद्युत करंटचे सहायाने वन्यप्राणी निलगायची शिकार करण्यात आली आहे. माहितीची तत्काळ दखल घेऊन वनविभागाने संपूर्ण क्षेत्राची तपासणी केली. तेव्हा आरोपी अशोक काशिनाथ कुकडकरने वन्यप्राणी निलगायची शिकार विद्युत करंट लावून केली. मृत निलगायची विल्हेवाट लावण्यांकरीता मृत निलगाय शेताच्या धुन्यावर धांडयाच्या सहायाने झाकून ठेवले होते. दरम्यान, मृत निलगायचे शवविच्छेदन करुन, नमुने फॉरेन्सिक चाचणीकरीता पाठविण्यात आले आहे.

सापळा रचून केली आरोपीला अटक -

निलगाईची शिकार झाल्याची खात्रीलायक माहिती समजताच वन विभागाने आरोपीला अटक करण्यासाठी हालचाल सुरू केली. वनविभागाने आरोपीला अटक करण्यासाठी शेतात सापळा रचला होता. यावेळी शेताकडे आरोपी भटकला नाही. मात्र, त्यानंतर आरोपीने स्वतः वन विभागासमोर आत्मसमर्पण करत गुन्हा कबुल केला.

हेही वाचा -MH Government Employees Strike : सरकारी कर्मचारी बुधवारपासून संपावर; 'या' आहेत मागण्या

शिकाऱ्यांना अटक -

वनविभागाची सापळा कार्यवाही सुरु असतांना तीन व्यक्ती आहेत, ज्यामध्ये संजय बबन उईके, बाबुलाल जगन जाधव आणि बंडू कवडू पवार हे संरक्षित वन नियतक्षेत्र काजळी जंगलात प्लास्टिकचे चुगडीसह जाताना आढळले. तिनही व्यक्तींची तपासणी केली असता त्यांच्याजवळ प्लास्टिकचे चुगडीत सहा वागळी (जाळे) व 24 लाकडी खुंटया आढळल्या. तिघांना याबाबत विचारणा केली असता, ससा या वन्यप्राण्यांची शिकार करण्याकरीता जंगलात जात असल्याचे स्पष्ट झाले व आरोपीने वनविभागासमोर आत्मसमर्पण करत गुन्हा कबुल केला. याप्रकरणी वनगुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details