नागपूर -दिवसभरात नागपूर शहरात ५५ नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ हजार २३४ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्वाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपुरात ५५ कोरोना रुग्णांची वाढ; ३८ रुग्णांची कोरोनावर मात
आतापर्यंत नागपुरात एकूण ३४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात कोविडचे लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने, त्यांना आमदार निवास येथे तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला स्थानांतरीत करण्यात आले आहे.
शनिवारी २८ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ४६८ इतकी झाली आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २४० रुग्ण नागपूर ग्रामीणचे असून त्यापैकी १६० रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शिवाय आतापर्यंत नागपुरात एकूण ३४ कोरोनाबाधित मृत्यू झाला आहे. नागपुरात कोविडचे लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना आमदार निवास येथे तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला स्थानांतरीत करण्यात आले आहे.सध्या नागपुरात ७३२ सक्रिय रुग्णांवर मेयो, मेडिकल, एम्स आणि मिलिटरी हॉस्पिटल कामठी येथे उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा १.५२ टक्के इतका आहे.