नागपूर :रक्तदानाचं महत्व सर्वांना कळावं या उद्देशाने १९७५ पासून ०१ ऑक्टोबर हा दिवस आपल्या देशात 'राष्ट्रीय रक्तदान दिवस' म्हणून साजरा केला जातो. कुणाचाही जीव वाचवण्यासाठी रक्तदान करणे किती महत्वाचे आहे, या बाबतचे महत्वाचे आता सर्वांनाच पटल्याने स्वेइच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची मोठी फळीच आपल्या देशात उभी झाली आहे. असं म्हणतात की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे अनेक रक्तदाते मोठ्या संख्येने पुढे येऊन रक्तदान करत आहेत. अनेकांच्या तोंडातून ऐकलं असेल की १० वेळा रक्तदान केलं, ५० वेळा रक्तदान केलं. मात्र नागपुरात राहणारे ५९ वर्षीय डॉक्टरेट बाळकृष्ण महाजन यांनी तब्बल 109 वेळा रक्तदान करून मोठा आदर्श निर्माण केला आहे. वयाच्या ६५ वर्षापर्यंत रक्तदान करता येते. त्यामुळे किमान १२५ वेळा रक्तदान करण्याची बाळकृष्ण यांची इच्छा आहे. प्रकृतीने साथ दिल्यास १५० वेळा रक्तदान करण्याचा त्यांनी निश्चिय केला आहे.
रक्तदान करण्याचं आवाहन
कुणालाही रक्ताची गरज असल्यास सदैव तत्पर असलेले डॉक्टर महाजन गरजूनां मदत म्हणून रक्तदान तर करतातच. मात्र दर तीन महिन्याला रक्तदान करण्याचा नित्यक्रम त्यांनी गेल्या ४२ वर्षांपासून जोपासला हे विशेष. डॉ बाळकृष्ण महाजन हे आज ५९ वर्षांचे आहेत. पुढच्या महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीनंतर तरुणांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. किमान वर्षभरात एकदा तरी प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे, असं आवाहन देखील ते करत आहेत.
अपघातग्रस्तांना रक्तदान केल्याने मिळाली प्रेरणा