नागपूर :शरद पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकात काँग्रेस पक्षाच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत नाना पटोले म्हणाले की, शरद पवार मोठे राष्ट्रीय नेते आहे. ते काहीही लिहू शकतात, बोलू शकतात. आम्ही त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देणे योग्य नाही. योग्य वेळी बोलू. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेले फेरबदल हे त्यांच्या पक्षांतर्गत बाब आहे. स्वतः शरद पवार यांनी मार्गदर्शक म्हणून राहणार, असे सांगितले आहे. त्यांच्या पक्षांतर्गत बाबीवर आम्ही बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडींचा महाविकास आघाडीवर काही फरक पडणार नाही, असे देखील नाना म्हणाले आहेत. मुंबईत गेल्यावर वेळ ऍडजस्ट झाल्यावर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी :शेतकरी अडचणीत आहे. सरकारचे अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे शेतकरी अनेक ठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. हे सर्व आम्ही सोमवारी राज्यपाल यांना सांगितले आहे. खारघरच्या घटनेबद्दल सरकार बोलायला तयार नाही. आम्ही सोमवारी राज्यपालांकडे खारघारच्या घटनेबद्दल विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी केली असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.