नागपूर -मुंबईउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपासंदर्भातल्या प्रकरणाची सुनावणी रविवारी घेण्यात आली. यात रेमडीसीवीरच्या वाटपा संदर्भात महत्त्वाचे निर्देश न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि श्रीराम मोडक यांनी केंद्रसरकार व राज्यसरकारला दिले होते. यासोबत शनिवारी दिलेल्या आदेशानुसार नागपूरला 15 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाटप संध्याकाळपर्यंत होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
उच्च न्यायालयाचा हस्तक्षेपानंतर नागपूरला मिळाले 15 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन राज्याला 4 लाख 73 हजार इंजेक्शनचे होणार वाटप -
1 मे रोजी संध्याकाळपर्यंत नागपुरात १५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन राज्य सरकारने पोहोचवावे, असे निर्देश न्यालालयाने दिले होते. ती खेप सकाळी पोहचली असून आज त्याचे वाटप होणार आहे. यासोबत 5 हजार इंजेक्शन हे भंडारा, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्याला पुरवठा होणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. यासोबतच केंद्रसरकारकडून 10 मेपर्यंतसाठी राज्याला 4 लाख 73 हजार इंजेक्शनचा वाटप करण्यात आले. हे विभाजन पाहता राज्याच्या तुलनेत कमी आहे. जवळपास 40 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. यामुळे याचे वाटप किंवा वितरण करताना रुग्णाच्या संख्येचा आधारावर रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप व्हावे, अशी मागणी विधीज्ञ तुषार मंडलेकर यांनी केली. याच आधारावर काही जिल्ह्यांना कमी-अधिक न देता रुग्णसंख्येच्या आधारावर हे वाटप करण्यात यावे, अश्या सूचना अन्न व औषध प्रशासनाला न्यायालयाने दिल्या आहे. यात महाराष्ट्राला मिळालेला साठा रुग्णसंख्येच्या तुलनेत अपुरा असल्याने तो वाढवण्यासदर्भात प्रयत्न करावे, असेही निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले आहे.
हेही वाचा - 'पुद्दुचेरी आणि तामिळनाडू वगळता कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही'