नागपूर -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची स्पष्टोक्ती विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रकाव्दारे दिली आहे. उशीरा रात्री ही माहिती विद्यापीठाने परिपत्रकाव्दारे जारी केली आहे. शिवाय परिक्षेबाबतच्या पुढील तारखा लवकर स्पष्ट केल्या जाईल, असेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मात्र या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थांमध्ये नाराजी सूर दिसून येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परिक्षा होणार की नाही. याबाबत साशंका असताना परिक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या. अशातच आता नागपूर विद्यापीठाने पुन्हा अंतिम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी लेखणी बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाने एका परिपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे. शिवाय या परिक्षांबाबत पुढील तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे झालेल्या चर्चानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा परिक्षेसाठी वाट पाहावी लागणार आहे. असे असले विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थांमधे नाराजीचा सूर असल्याचे दिसून येत आहे.