नागपूर- विदर्भाचे पंढरपूर म्हणून नागपूर जिल्ह्याच्या धापेवाडय़ातील स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठय़ा प्रमाणात वारकरी आणि भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येथे आले आहेत.
नागपूर: विदर्भाच्या पंढरीत आज वैष्णवांचा मेळा
विदर्भाचे पंढरपूर म्हणून नागपूर जिल्ह्याच्या धापेवाडय़ातील स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठय़ा प्रमाणात वारकरी आणि भाविक दर्शनासाठी येथे आले आहेत.
दरवर्षी आषाढी एकादशीला धापेवाडय़ाला नागपूर जिल्हा व परिसरातील भाविकांची गर्दी होते.यावर्षीही अनेक दिंडय़ा विठ्ठलनामाचा जयघोष करीत धापेवाडय़ात दाखल झाल्या आहेत. विदर्भाचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारे श्रीक्षेत्र धापेवाडा आषाढी यात्रेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढी पौर्णिमेला विठ्ठल धापेवाडा येथे जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे जे लोक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते दर्शनासाठी धापेवाडा येथे येतात.
धापेवाडा आधी धर्मपुरी या नावाने ओळखले जायचे. यानंतर धर्मनगरी असे नाव पडले व धर्मनगरीचा अपभ्रंश होऊन धापेवाडा असे नाव रुढ झाले. प्रभू श्रीराम हिंदूगिरी अर्थात आजच्या रामटेकला जात असताना धर्मापुरी येथे थांबले होते, असा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आहे.