महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुकाराम मुंढेंच्या एका निर्णयामुळे आयुक्त विरुद्ध नगरसेवक रंगणार सामना

नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून रुजू होऊन तुकाराम मुंढे यांना अजून महिना झाला नाही तोच आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा प्रसंग उभा राहिला आहे. सोबतच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ढासळत असल्याने त्याला शिस्त लावण्याचा संकल्प देखील आयुक्तांनी केला आहे.

tukaram mundhe nagpur
तुकाराम मुंढे

By

Published : Feb 16, 2020, 10:33 AM IST

नागपूर - महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आर्थिक स्थिती ठीक नसल्याचे कारण देत शहरातील विकासकाम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. पुन्हा एकदा आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा सामना रंगला आहे. पालिकेतील आर्थिक स्थिती कशी आहे? याची माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे तर सत्ताधारी भाजप हे सुडाचे राजकारण असल्याचे सांगत आहे.

तुकाराम मुंढे यांच्या एका निर्णयामुळे आयुक्त विरुद्ध नगरसेवक सामना रंगणार

हेही वाचा -जबरदस्त उत्तर! काश्मीर मुद्दा काढताच जयशंकर म्हणाले, 'सिनेटर, तुम्ही काळजी करू नका....'

नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून रुजू होऊन मुंढे यांना अजून महिना झाला नाही तोच आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा प्रसंग उभा राहिला आहे. सोबतच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ढासळत असल्याने त्याला शिस्त लावण्याचा संकल्प देखील आयुक्तांनी घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून शहरातील वर्क ऑर्डर न झालेले विकास कामे तर आदेश निघालेली कामे देखील थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. शहरातील विविध विकास कामात महापालिकेचा हिस्सा असून, त्यापोटी सुमारे 400 कोटी रुपये थकीत आहेत. पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून, त्याला शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मुंढे यांनी पालिकेच्या विशेष सभेत सांगितले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप सोबतच विरोधीपक्षातील काँग्रेस देखील आक्रमक झाले आहेत.

आयुक्तांनी पालिकेची आर्थिक स्थिती काय आहे? याचे निवेदन सभागृहात करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सूड बुद्धीने मुंढे यांना पालिकेत पाठविल्याचा आरोप भाजपने लावला असून, राज्य सरकारचे प्रतिनिधी आयुक्त असल्याने ते देखील विकासकामांना स्थगिती देत असल्याच आरोप भाजपने केला आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रोड, नागनदी स्वछता मोहीम, मेट्रोचे काम सुरू आहे त्यात पालिकेचा हिस्सा थकीत असल्याने याचा परिणाम त्या कामावर देखील होत आहे. दुसऱ्या बाजूने विकास काम होणार नाही तर जनतेला काय उत्तर द्ययाची हा प्रश्न नगरसेवकांसमोर असणार आहे.

हेही वाचा -'आधी शहराचे प्रश्न सोडवा, नंतर आम्ही स्वतः नाव बदलाय मदत करू'


ABOUT THE AUTHOR

...view details