नागपूर - प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्ञानगंगा पोहचविण्या करिता स्थानिक स्वराज्य संस्थाकडून उभारण्यात आलेल्या मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही शाळा बंद पडल्या आहेत. या बंद पडलेल्या शाळेच्या परिसरात मद्यपी आपली सोय करत आहेत. जिथे ज्ञान दिले जाते तिथेच दारूचे अड्डेही सुरु झाले आहेत, असे चित्र आहे.
अबब... या मनपाच्या बंद शाळा आहेत की दारूचे अड्डे
इमारतीचा परिसर अडगळीत पडला आहे. दारूड्यांसाठी तर दारूचा अड्डाच झाला आहे. ज्ञान विहाराचे रूपांतर दारुच्या अड्ड्यात झाल्याचे चित्र आहे. नागपूरच्या सोमलवाडा उच्च प्राथमिक शाळेच्या या दृश्यावरून शाळेचा उपयोग मद्यपानासाठी होत आहे, हे मात्र निश्चित.
एकीकडे मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी इंग्रजी शाळांमध्ये देखील मराठीचे शिक्षण अनिवार्य करण्याची मागणी केली जाते आणि दुसरीकडे मात्र मनपाच्या उदासीन धोरणांमुळे मराठी शाळांना कुलूप लावण्याची पाळी येत आहे. नागपुरात महानगर पालिकेच्या ५७ शाळा बंद झाल्या आहेत. यात मराठी शाळांची संख्या जास्त आहे. २० पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करून शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करणे, असा शासनाचा निकष आहे. याच निकषाच्या आधारे मनापाच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
इमारतीचा परिसर अडगळीत पडला आहे. दारूड्यांसाठी तर दारूचा अड्डाच झाला आहे. ज्ञान विहाराचे रूपांतर दारुच्या अड्ड्यात झाल्याचे चित्र आहे. नागपूरच्या सोमलवाडा उच्च प्राथमिक शाळेच्या या दृश्यावरून शाळेचा उपयोग मद्यपानासाठी होत आहे, हे मात्र निश्चित. मनपाच्या अशा एकूण ३४ बंद शाळेच्या इमारतींचा उपयोग यासाठी होत आहे. काही वर्ग खोल्यांमध्ये भंगार साठविले असून या ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहे.