महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 2, 2021, 9:16 AM IST

ETV Bharat / state

जुन्या वादातून सराईत गुंड सलमानने केला प्रतिस्पर्धी अल्ताफचा खून

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सोमवारी एका सराईत आरोपीने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा खून केल्याचे समोर आले.

Dead Altaf
मृत अल्ताफ

नागपूर -शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हसनबाग परिसरातील शेष नगर भागात एका तरुणाचा खून झाला. अल्ताफ शेख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एक सराईत गुन्हेगार होता. आरोपी सराईत गुन्हेगार सलमान खान समशेर खान पठाण यांनी अल्ताफचा खून केला. आरोपी काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. आरोपी सलमान हा कुख्यात गुंड समशेर खान याचा मुलगा आहे. समशेर याचा २० वर्षांपूर्वी नागपूरच्या गुन्हेगारी जगतात मोठा दरारा होता.

सराईत गुंड सलमानने केला प्रतिस्पर्धी अल्ताफचा खून

जून्या वादातून झाला खून -

आरोपी सलमान आणि मृत अल्ताफ यांचे गेल्या काही दिवसात वैर वाढले होते. अल्ताफचे कळमना परिसरातील एका महिलेकडे जाणे-येणे होते. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. सोमवारी मृत अल्ताफ महिलेकडे आला असताना आरोपी सलमान सोबत त्याचा आमना सामना झाला. त्यावेळी सलमानने अल्ताफवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला. त्या ठिकाणावरून अल्ताफ पळत सुटल्यानंतर आरोपीने त्याचा पाठलाग करून खून केला. या घटनेची माहिती समजताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी मृताची ओळख पटवल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सध्या आरोपी सलमानचा शोध सुरू आहे.

दोन दशकांपूर्वी होती समशेरची दहशत

सराईत गुंड अल्ताफ शेखचा खून करणारा सलमान हा कुख्यात आरोपी समशेरचा मुलगा आहे. समशेरचा नागपूरच्या गुन्हेगारी जगतात दरारा होता. समशेर आणि त्याचा भाऊ मिळून टोळी चालवायचे. मात्र, टोळी युद्धातून समशेरच्या भावाचा खून झाला होता. त्यानंतर वृद्धापकाळाने तो देखील निष्क्रिय झाला. आता त्याचा मुलगा सलमान हा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून नागपुरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details