महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर उन्हाळ्याच्या पावलांनी जलसंकटाची चाहूल

सद्या परिस्थितीत नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये अवघा १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंतची तहान भागवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

By

Published : Feb 17, 2019, 12:36 PM IST

water issue

नागपूर -गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने राज्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्य स्थितीत राज्यातील जलसाठ्यांमध्ये फक्त ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १६ टक्क्यांनी कमी आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी सरकारकडून उपाय योजना करण्यात येणार असल्याचे, प्रशासनाकडून म्हटले जात आहे. मात्र, सरकार उपाय योजना करत नसल्याने मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सद्या परिस्थितीत नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांमध्ये अवघा १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा जुलैपर्यंतची तहान भागवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा ३४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला ६५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यातून ३० लाख लोकांची तहान भागवली जाते. याच कारणामुळे पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, या परिस्थिवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप स्थानिक करत आहे.

राज्यातील जलसाठ्यांमधील विभागवार पाणीसाठा

विभाग - यावर्षीचा पाणीसाठा - गेल्यावर्षीचा पाणीसाठा

अमरावती -३६ टक्के - २७ टक्के

औरंगाबाद - ११ टक्के - ४८ टक्के

नागपूर - १९ टक्के - २५ टक्के

नाशिक - ३५ टक्के - ५८ टक्के

पुणे - ५३ टक्के - ६८ टक्के

कोकण - ६१ टक्के - ६७ टक्के

एकूण संपूर्ण महाराष्ट्रातील यावर्षीचा पाणीसाठी ३८ टक्के तर मागील वर्षी हा जलसाठा ५४ टक्के होता.

ABOUT THE AUTHOR

...view details