नागपूर -जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना म्यूकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात म्यूकरमयकोसिसची रुग्णसंख्या अकराशेच्या पार पोहोचली आहे. याबरोबरच म्यूकरमायकोसिसमुळे 100 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा रोग आता अधिक घातक ठरताना दिसून येत आहे. शहरातील 64 रुग्णलयांसह मेयो मेडिकल आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील म्युकर मयकोसिसची परिस्थिती -
नागपूर शहरात एक जूनला एका दिवसात 25 रुग्णाची नोंद झाली आहे. तर मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मेला 26 म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यामुळे दोन दिवसात 51 रुग्ण मिळून आले आहेत. शासकीय दंत महाविद्यालयातील रुग्णालयात सुरुवातीला 40 ते 45 रुग्ण मिळून आले असताना खळबळ निर्माण झाली होती. मात्र, सध्याच्या घडीला शासकीय महाविद्यालयात सर्वाधिक 150 रुग्ण मिळाल्याची नोंद आहे. तर 15 रुग्ण दगावले आहे. दुसरीकडे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजेच मेयोमध्ये 64 रुग्ण उपचारासाठी मिळून आले आहेत. तर 5 रुग्ण दगावले आहे. नागपूर ग्रामीणमध्ये 20 रुग्ण मिळून आले असून यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नागपूर मनपा क्षेत्रातील खासगी रुग्णालयात 886 रुग्ण मिळून आले आहेत. तर 85 रुग्ण दगावले आहेत. यात 107 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर म्यूकरमायकोसिस बाधितांची एकूण 1 हजार 122वर पोहोचली आहे.
हेही वाचा -'चंद्रकांत पाटलांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही'; शिवसेना प्रवक्त्यांची टीका
पूर्व विदर्भातील म्युकरची रुग्णसंख्या -