नागपूर- आम्ही सक्षम असल्यानेच तीन पक्ष एकत्र येऊन आमच्या विरुद्ध निवडणूक लढत आहेत. यावरून आमची राजकीय शक्ती किती आहे याचा प्रत्यय येत आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये ताळमेळ दिसत नसून शिवसेनेने तर राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपली मूळ विचारधाराच बाजूला केल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्वतःच्याच वजनाने डुबणार - नितीन गडकरी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, की मुंबईतून बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा. ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र, याचे समर्थन करण्याऐवजी शिवसेना ही राजकीय स्वार्थासाठी गप्प बसली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे हिंदू आणि मराठी माणूस त्यांच्याशी नाराज झाला आहे, असे देखील नितीन गडकरी म्हणाले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी, असे चित्र निर्माण झाले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदर प्रतिक्रिया दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, मुंबईतून बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा. ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र, याचे समर्थन करण्याऐवजी शिवसेना ही राजकीय स्वार्थासाठी गप्प बसली आहे. देशाची अस्मिता असलेल्या सावरकरांचा अपमान करण्याचे कृत्य काँग्रेसकडून केले जात आहे. यावरसुद्धा शिवसेना काहीच बोलत नाही. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे हिंदू आणि मराठी माणूस त्यांच्याशी नाराज झाला आहे, असे देखील नितीन गडकरी म्हणाले.
हेही वाचा-राज्याला ऊर्जावान करण्याची जबाबदारी माझी - ऊर्जामंत्री नितीन राऊत