नागपूर - जिव्हाळा फाउंडेशनतर्फे शिव जयंतीच्या निमित्त रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिराच्या महर्षी व्यास सभागृहात 'जम्मू-कश्मीर लद्दाख कल और आज' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात लद्दाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल सहभागी झाले होते.
'जम्मू-कश्मीर लद्दाख कल और आज' विषयावर नागपुरात व्याख्यान
जिव्हाळा फाउंडेशनतर्फे शिव जयंतीच्या निमित्त रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिराच्या महर्षी व्यास सभागृहात 'जम्मू-कश्मीर लद्दाख कल और आज' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात लद्दाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल सहभागी झाले होते.
हेही वाचा -नागपुरातील व्यावसायिकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला; 20 तोळे सोने केले लंपास
कलम 370 मुळेच जम्मू-काश्मीर आणि लद्दाख भारतात आहे असं सांगितलं जात होते. पण ज्यावेळी कलम 370 हटवण्यात आले तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही भारताचा अभिन्न अंग असल्याचे लद्दाखचे नामग्याल म्हणाले. कलम 370 हटविले तर झेंडा उचलणारा कुणी मिळणार नाही, अशी धमकी दिली जायची. मात्र, मोदी आणि शहा यांनी ऐतिहासिक नाही तर साहसिक पाऊल उचलले ज्यानंतर लद्दाखमध्येही देशभक्त राहतात हे जगाला दिसले. आपल्या देशात लोकशाही आहे ती लोकशाहीच असायला हवी ती ओव्हर डेमोक्रॅटिक होऊ नये याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.