नागपूर -एकीकडे संपूर्ण नागपूर शहरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील प्रादेशिक वन विभागाच्या खापा वनपरिक्षेत्रात एका मादी बिबट आणि तिचा शावक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत मादी बिबटचे वय साडे चार वर्ष तर शावकाचे वय अवघे चार महिने असल्याची माहिती पुढे आली आहे. उष्णघात किंवा तहान भूकेने मादी बिबट आणि तिच्या शावकाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधला जातो आहे.
मोहगाव पेंढरी येथील कोरड्या पडलेल्या नाल्यात वन कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान मादी बिबट आणि तिचा शावक मृतावस्थेत आढळून आला. या संदर्भात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले असता ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही बिबट्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण कळावे या करिता शरीरातील काही भाग फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
सर्व अवयव शाबूत तरी शंकेला वाव