नागपूर - स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वीजमंत्री करण्यात आले होते. मी देखील बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला मिळालेले मंत्रालय हा मी माझा सन्मान मानतो. असे मत डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. ते 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीशी बोलत होते.
राज्याला ऊर्जावान करण्याची जबाबदारी माझी - ऊर्जामंत्री नितीन राऊत
राज्याच्या मंत्रिमंडळात नितीन राऊत यांना उर्जा खात्याचा कारभार सोपवला आहे. मंत्रीमंडळ खातेवाटपाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याला ऊर्जावान करण्याची जबाबदारी माझी - ऊर्जामंत्री नितीन राऊत
हेही वाचा -राज्यात ३ पक्षांचे सरकार, मोठे निर्णय घ्यायला वेळ लागणारच
राज्याच्या मंत्रिमंडळात नितीन राऊत यांना उर्जा खात्याचा कारभार सोपवला आहे. मंत्रीमंडळ खातेवाटपाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, शपथविधीच्या कार्यक्रमात राज्यातील शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. हे सूचक असून महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांकरिता काम करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.