नागपूर - देशात कोरोनाचा प्रसार झाला असून कोरोना संशयित आणि कोरोना रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. तसेच काही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या उन्हाळा सुरू असून नागपूर जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. विश्वेश्वरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) क्वारंटाईन सेंटरमधील लोकांनी अन्नासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.
'निकृष्ट दर्जाचे जेवण अन् पिण्यासाठी पाणीही नाही', क्वारंटाईन सेंटरमधील लोकांनी घातला गोंधळ
नागपूर जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंट्ररमधील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विश्वेश्वरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) क्वारंटाईन सेंटरमधील लोकांनी अन्नासंदर्भात तक्रारी केल्या आहेत.
नागपूर
आम्हाला दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये किडे सापडत असल्याचे, क्वारंटाईन सेंटरमधील लोकांनी म्हटलं आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा होत नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना यापूर्वीच कळविण्यात आले आहे, परंतु अद्याप योग्य कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती आहे. म्हणूनच, क्वारंटाईन सेंटरमध्ये राहणे कठीण जात आहे.