महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात लष्करी जवानाच्या खात्यातून ५४ हजार लंपास; आरोपींची आंतरराज्यीय टोळी सक्रिय

या संदर्भात बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता बनावट कार्ड आणि एटीएम पिन चोरून रक्कम लंपास झाल्याचा संशय बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

By

Published : May 11, 2019, 4:31 PM IST

नागपुरात लष्कर जवानाच्या खात्यातून ५४ हजार लंपास

नागपूर- लष्करी जवानाच्या बँक खात्यातून ५४ हजार ५०० रुपये भामट्याने लंपास केल्याची माहिती पुढे आली आहे. जवानाच्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अमृते असे फसवणूक झालेल्या जवानाचे नाव असून प्रशांत हा गुवाहाटीमध्ये ११- आसाम रायफल विभागात कार्यरत आहे.

नागपुरात लष्कर जवानाच्या खात्यातून ५४ हजार लंपास

सक्करदराच्या स्टेट बँकेत अमृत आणि त्यांची पत्नी अनिता यांचे संयुक्त खाते आहे. या खात्याचे दोन स्वतंत्र एटीएम कार्ड आणि त्याचे नंबर आणि पिनकोड देखील वेगवेगळा आहे. त्यांच्या खात्यातून ४० हजार विड्रॉल केल्याचा एसएमएस प्रशांत यांना आला. त्यानंतर लगेच १४ हजार ५०० ट्रान्स्फर झाल्याचे त्यांना कळाले.

या संदर्भात बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता बनावट कार्ड आणि एटीएम पिन चोरून रक्कम लंपास झाल्याचा संशय बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रशांत यांच्या बँक खात्यातील ४० हजार कोलकातावरून काढण्यात आले असून १४ हजार ५०० राजस्थानला ट्रान्सफर झाले अशी प्राथमिक महिती पोलीस तपासात पुढे आली आहे. बँक खात्यांतून परस्पर पैसे लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details