नागपूर - शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसल्यास तो लैंगिक अत्याचार ठरणार नाही. तो पॉक्सो अंतर्गत लैगिक अत्याचार होणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचारात शिक्षा सुनावलेल्या प्रकरणात हा निकाल देण्यात आला.
नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 39 वर्षीय व्यक्तीवर 12 वर्षीय मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आरोपीला शिक्षाही सुनावण्यात आली होती. पण, याबाबत आरोपीच्या वकीलाने नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी निरीक्षण नोंदवले. त्यांनी नोंदवलेल्या टिप्पणीनुसार शरीराला शरीराशी संपर्क किंवा स्पर्श होणार नाही. कपड्यावरुन केलेली चाचपणी लैंगिक अत्याचार म्हणता येणार नसल्याचे गनेडीवाला यांनी सांगितले.