महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार आशिष जयस्वालांची हिवरा बाजार धान खरेदी केंद्रावर धाड; अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

हिवरा बाजार येथील केंद्र व्यवस्थापक शेतकऱ्यांनी आणलेले धान परत पाठवून व्यापाऱ्यांनी आणलेल्या धानाला प्राधान्य देत असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याला मिळाल्या होत्या. असे आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे.

MLA Ashish Jaiswal
आमदार आशिष जयस्वाल

By

Published : May 1, 2020, 1:08 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हिवरा बाजार येथील धान खरेदी केंद्रावर धाड टाकली. आमदारांच्या अचानक भेटीने तेथील अधिकाऱ्यांचा गोंधळ उडाळा. यावेळी आमदारांनी तिथे सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा भांडाफोड केल्याचा दावा केला आहे. याबाबतचा एका व्हिडिओ देखील वायरल झाला आहे. ज्यामध्ये धान खरेदी केंद्रावर आमदार महोदय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत असल्याचे दिसत आहे.

आमदार आशिष जयस्वाल यांची हिवरा बाजार धान खरेदी केंद्रावर धाड...

हेही वाचा...हीरकमहोत्सवी महाराष्ट्र : नेत्यांनी अन् कलाकारांनी दिल्या शुभेच्छा..

रामटेक तालुक्यातील हिवरा बाजार येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांसह आदिवासी शेतकऱ्यांच्या धान खरेदीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र, असे असतानाही तेथील केंद्र व्यवस्थापक शेतकऱ्यांनी आणलेले धान परत पाठवून व्यापाऱ्यांनी आणलेल्या धानाला प्राधान्य देत असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याला मिळाल्या होत्या. असे आशिष जयस्वाल यांनी म्हटले आहे. त्यामुळेच त्यांनी हिवरा बाजार येथील धान खरेदी केंद्रावर अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांना सदर धान खरेदी केंद्रावर गरीब शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर केंद्राच्या व्यवस्थापकाला या संदर्भात जाब विचारला असता त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. तसेच त्या ठिकाणी सुरू असलेल्या धान खरेदीचा व्यवहार तपासण्यासाठी रजिस्टर मागितले असता त्या ठिकाणी दोन रजिस्टर असल्याचे आढळून आले, अशी माहिती आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details